--------------------------------------------------------------------------------------------------
आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग..
-------------------------------------------------------------------------------------------------
ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.
सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म.
कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून?
आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही,
झंझावातालाही असतं.
------------------------------------------------------------------------------------------------
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.
-----------------------------------------------------------------------------------------------
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही.
कधी ना कधी ते पळणार्याला गाठतातच
पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत.
मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच
-----------------------------------------------------------------------------------------------
पारिजातकाचं आयूष्य लाभलं तरी चालेल. पण लयलुट करायची ती सुगंधाचीच !
------------------------------------------------------------------------------------------------
वियोग झाल्यावर माणुस का रडतो?
-ते फक्त वियोगाचं दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात,
त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणिवेचं दुःखही त्यात असतं.
------------------------------------------------------------------------------------------------
"स्वत:चा पराभव जेव्हा स्वत:जवळ मान्य करावसा वाटत नाही तेव्हा डोळ्यांतुन
येणार पाणी पापणीच्या आत जिरवायचं असत."
------------------------------------------------------------------------------------------------
सावली देऊ शकणार्या वट वृक्षान
विश्रांतीला आलेल्या पाथस्थाला
बाकीची झाड सोडून तुला नेमका मीच सापडलो का?
अस विचारायच नसत..............
-----------------------------------------------------------------------------------------------
जन्माला आलेल्या प्रत्येकाला आई आणि बापाच प्रेम लाभायलाच हव दोघांच्याही प्रेमात खूप फरक असतो कस सांगू?
मुलाला जे हव ते मुलाने मागण्यापूर्वीच आईला समजलेला असत.बापाला पुष्कळदा ते सांगितल्यावर समजत,
म्हणूनच हट्ट करून एखादी गोष्ट वसूल केल्याचा आनद वडिलांकडून भेटतो.
आईच प्रेम आंधळ,भाबडा महणून की काय,मुलाच चुकल की तो तिला स्वत:चा पराभव वाटतो.
स्वत:च नुकसान झाल असाच ती मानते.बापाच प्रेम डोळस महणून मुलाच्या हातून होणार्या चुकांचे फटके मुलालाच जास्त बसणार म्हणून तो कसावीस होतो.
अंगावर वार झाले तर आईचे प्रेम फुंकर घालते,पण बाप होणारे वार वरच्यावर अडवू शकतो.
म्हणूनच आईच्या प्रेमाला पारख होण्याची पाळी आली तर गाभार्याताली समई विझल्यासारख वाटत आणि बापच प्रेम लाभाल नाही तर त्याच देवळचा कळस कुणीतरी नेल्यासारखी अवस्था होते.
म्हणूनच मुलाला दोघही हवीत.
कडाक्याची थंडी पडली की शाल घेऊन भागात नाही आणि नुसत ब्लॅंकेट असल तरी पोरकेपणाची भावना तशीच राहते,
म्हणून आईच्या शलिच्या वर बापाच भरभक्कम ब्लॅंकेट हव...................................
------------------------------------------------------------------------------------------------
आपण जसे आहोत तसे असायला नको होत;
हे वाटण ह्यालाच माणूस म्हणतात................
------------------------------------------------------------------------------------------------
वर्धक्यात दात,नजर,केस,कान एकेक निकामी होत त्याला आमचे काका म्हणतात
नियती तुमच्याकडून दीर्घायुष्य लाभाल्याबद्दल सर्व्हाइवल टॅक्स वसूल करते...................
------------------------------------------------------------------------------------------------
हवेत ओक्सिजन असतोच पण.........
मशाला पाण्यातलाच ओक्सिजन हवा असतो.
मला तूच हवी होतीस आणि नियती
एक व्यक्ती एकदाच जन्माला घालते!!!....................
-------------------------------------------------------------------------------------------------
कोणतही समर्थन मूळ दूःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची , ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच.
-------------------------------------------------------------------------------------------------
आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसंच आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल, तर क्षितीज नक्की गाठता यॆत. आपल्या रक्तातच धमक असॆल,तर जगंही जिंकता यॆत. आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं, त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं. असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद, त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
-------------------------------------------------------------------------------------------------
आयडेंटिटी कार्डासारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात नसेल. आपण आहोत कसे? हे खरं त्यांना हवं असतं. त्याऎवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते आपल्याला ओळखतात.
------------------------------------------------------------------------------------------------
तत्वाला चिकटुन कसं राहायचं हे पालीकडुन शिकावं. मुंगळा तसाच मान तुटली तरी गुळापासुन किंव्हा आपल्या पायाचा चावा घेतल्यशिवाय सोडत नाही. स्वत:च घर स्वत:च सांभाळायचं हे गोगल्गायीकडुन शिकवं. हाक मारताच क्षणीच तिथ क्षणात झेपावायचं आणि तोपर्यं बटणापाशीच थांबायचं हे इलेक्ट्रीसिटीकडुन शिकावं. सगळ्या पक्षांमध्ये घुबड हा एकमेव पक्षी कळप करुन रहत नाही, असं ऐकलय.एकटीने कसं जगाव. हे घुबडकडुन शिकव. समाज तप्त सूर्यासारखा असतोऽअगीचा कितीहि वर्षाव झाला तरीही सुर्यफुले सूर्याकडेच पाहत राह्तात.तोंड फिरवत नाईत.एखाद्या निरधार स्त्रीकडे समाज अशाच नजरेने पाहत असतोऽशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत कसं राहायचं ते सुर्यफुल शिकवतात. हे सर्व गुरु म्हणुन स्विकरले असेल तर जीवन जगणं सोप्प होईल.
-------------------------------------------------------------------------------------------------
सर्वात जवळची माणसच जास्त तर्हयेवाईकपणे पणे वागतात.
त्याच आपण मुळीच मनाला लावून घेऊ नये.
परक्या माणसाकडून काहीही अपेक्षा करू नये ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो.
एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भांगाच दु:ख निर्माणच होत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------
एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'
व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.
-------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment