Friday, February 20, 2009

काही सुंदर कविता....

कधीतरी आलीच असेल ना याद?
घातली असेल जेव्हा माझ्या ऋतूंनी साद?
मोहरले असेल तुझे मन ,
तुझ्या मनाविरुध्द....
जाणता अजाणता
दिलाच असशील ना प्रतिसाद?

बावरली असशील ना चेहे-यावरचे ते भाव पाहून ?
जेव्हा बोलली असशील आरशाशी ...
कारणावाचून ...
घरातल्या घरात देखील भिजली असशील चिंब
पाहून तुझ्या आरश्यात
माझे प्रतिबिंब !

समजलंच असणार किती केलंय प्रेम
आजच कबूल कर... उद्याचा काय नेम !
घे एकदा स्वतःच्या
अंतर्मनाचा ठाव ...
पण उत्तर मिळेपर्यंततरी पुसू नकोस
नकळत हातावर लिहीलेलं
माझं नाव ........

-------------------------------------------------------------------------------------------------

तुझ्या हृदयाच्या गाभा-यात
मला मूर्ती नाही होता आलं
तर निदान निर्माल्य तरी होईन
पण आत अगदी खोलवर
तुझाच होऊन राहीन


असं वाटतं सांगायचं राहून गेलं
तू निघून गेल्यावर,
मन तेव्हा रितं होतं
डोळ्यांचा प्याला भरून आल्यावर

सई तुझ्या आठवणीत
मी उधाणलेला होतो,
तू जायला निघालिस की
मी थेंब थेंब ओह्टुन जातो

सखे तुझ्या आठवणी
चुरगळून फेकायला विसरलो,
वाट्याला आलेले प्रारब्ध
पुसायला विसरलो

चांदण्यात रात गेली
चंद्रात रात गेली,
मुके मुके क्षण माझे
तुझ्या आठवणींच्या
गजरात रात गेली.

तू आहेस कुठे?
हृदयात, जिथ स्पंदनांच गाव आहे,
तू नसलीस तर तिथ
जीवन जगण्याचा अभाव आहे
------------------------------------------------------------------------------------------------

पावसाच्या सरी सगळ्यांसाठी असतात ...

पण मनात भरून आलेले ढग आपलेच असतात !

मनातलं वादळ कोणालाच दिसत नाही ,

बरसणाऱ्या अश्रूंच्या सरी फ़क्त आपल्याच असतात !!!
-------------------------------------------------------------------------------------------------

फार काही नकोय तुझ्याकडून...
फक्त मिठीत घे...

एखाद्या संध्याकाळी मनात वादळ उभ राहिल्यावर..
फक्त मिठीत घे...

सगळी दुनिया विरोधात असल्यावर..
फक्त मिठीत घे...

जगण्याची लढाई लढताना खुप थकल्यावर..
फक्त मिठीत घे..

जगण्याची इच्छाच मरून गेल्यावर...
फक्त मिठीत घे...

मरणाच्या आधी दोन क्षण...
फक्त मिठीत घे....

No comments: